CVV’s Dean of faculties, Dr Gauri Mahulikar was invited as a speaker on 15th February, for the two-day Shankara Mahotsav organised by the Sanskrit Department of Ramnarain Ruia Autonomous College, in Mumbai. Dr. Mahulikar spoke on ‘Sankaracharya’s Tattva Gnana’, explaining the basics of Sri Adi Sankaracharya’s works in simple language with examples and references that would relate with youth. The feedback from the mostly young audience proved that the talk was well received. Below is the feedback received from one of the students.
———-
दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा आयोजित ‘शांकर-महोत्सवास’ उपस्थित राहण्याचा योग जुळून आला.
या महोत्सवात माझ्या गुरू डॉ. गौरी माहुलीकर बाईंचे ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील व्याख्यान ऐकण्यास मिळाले. भारतरत्न Dr. M. S. Subbulakshmi यांच्या सुमधुर आवाजात मधुराष्टकम् ऐकणे व माहुलीकर बाईंच्या तोंडून तत्त्वज्ञानावर व्याख्यान (त्यातही केवलाद्वैत हा विषय) ऐकणे मला तरी समानच भासतात. दोहोंतही ऐकताना आपण अगदी तल्लीन होऊन जातो.
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम्!
नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्!!
आसेतुहिमालय भारतभ्रमण करुन सनातन धर्माचे पुनरुत्थान करण्याचे महत्कठीण कार्य ज्यांनी केले त्या आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या केवलाद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानाचा परीचय बाईंनी त्यांच्या व्याख्यानातून केला. त्या ज्ञानरूपी महासागरातील काही विचाररुपी मोती मला वेचता आले.
आचार्यांचे तत्त्वज्ञान मुख्यतः त्रिविध ग्रंथांमधून आपणास अभ्यावयास मिळते –
1) उत्तमाधिकारींसाठी – भाष्यग्रंथ व टीकाग्रंथ
2) मध्यमाधिकारींसाठी – प्रकरणग्रंथ
3) अवराधिकारींसाठी – स्तोत्रग्रंथ
उत्तमाधिकारींसाठी अभ्यासासाठी असलेल्या प्रस्थानत्रयी-
1) सर्वश्रुत श्रीमद्भगवदगीता – स्मृति प्रस्थान
2) उपनिषदे – श्रुती प्रस्थान
3) ब्रह्मसूत्रे – न्याय प्रस्थान
बाईंनी सहज सोप्या भाषेत सांगितलेली तत्त्वज्ञानाची उद्दीष्टे – ‘जीव (man), जगत् (matter) आणि जगदीश्वर (maker) यांच्यातील नात्याची उकल करणे’ होत.
बाईंनी त्यांच्या आवडीचे ब्रह्मसूत्र – शारीरक भाष्य well known as शांकरभाष्य थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला.
‘अथातो ब्रह्मजिज्ञासा!’ अशी सुरुवात करून आचार्यांनी सांगितलेली ब्रह्मलक्षणे, जीवाविषयी विचार, माया, मोक्षविचार यांचे उपलब्ध अत्यल्प वेळेत सांगोपांग विवेचन बाईंनी केले. आचार्यांनी दिलेली उदाहरणे अधिक सोपी करुन बाईंनी सांगितली. पंचकोशातील ‘मय’ हा प्रत्यय पहील्या चार कोशांसाठी ‘विकारार्थ’ व आनंदमय कोशासाठी ‘प्राचुर्यार्थ’ वापरलेला आहे. ‘अतस्मिंस्तद्बुद्धि:’ म्हणजे बाह्य जग खरे नसले तरी तसे भासते हा ‘अध्यास’ होय.
‘ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति’ ही आचार्यांची शिकवण बाईंनी श्रोत्यांपर्यंत साध्या सोप्या शब्दात पोचवण्याचं काम केलं. मोक्षप्राप्ती ही जीवंतपणीही होते, त्या अनुषंगाने आलेली ‘जीवन्मुक्त’ ही संकल्पना विशद केली. साप त्याने टाकलेल्या कातीकडे जसा पाहतो तसे जीवाकडे पाहण्याची भावना म्हणजे वैराग्य होय.
वेदांतदर्शनातला ‘पञ्चीकरण सिद्धांत’ बाईंनी समजावून सांगितला. (विवेकचूडामणि)
अनेक उदाहरणे देवून एकच मुद्दा स्पष्ट करण्याची ‘गुरुशिष्यसंवादात्मक प्रकरणग्रंथांची’ शैली बाईंनी उदाहरणांवरून स्पष्ट केली.
स्तोत्रग्रंथ कसे सगुण साकार भक्तीमार्गाद्वारे निर्गुण निराकार ब्रह्मचैतन्याची ओळख करून देतात हे बाईंनी पटवून दिले.
अरुंधतीन्यायाद्वारे ancient Indian Pedagogy तर घटाकाशमहाकाश उदाहरणांवरून ‘जीवो ब्रह्मैव नापरः’ या गोष्टी बाईंनी समजावून दिल्या.
‘ज्ञानान्मोक्षः’ वा ‘विना ज्ञानं मोक्षो न सिध्यति!’ – ब्रह्मचैतन्य या गन्तव्यस्थानी ज्ञानरूपी नावेतूनच जावे लागते, आणि या नौकेला भक्तीरुपी वल्हे लावले की मार्ग सुकर होतो.
खरेतर, मनुष्यप्राण्याची सर्वात मोठी भिती ‘मृत्यूची भिती’ घालवून त्याला ज्ञानमार्गाकडे प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून आचार्यांनी केवलाद्वैताची स्थापना केली व हे तत्त्वज्ञान जनमानसात रूजवण्याचे महान कार्य केले. अद्वैत वेदान्त हे केवळ तत्त्वज्ञान नसून तो जगण्याचा एक प्रशस्त मार्ग आहे.
तत्त्वज्ञानासाठी सांगितलेली साधने- श्रवण, मनन, निदिध्यासन आणि समाधी. आज बाईंच्या व्याख्यानाच्या माध्यमातून ‘श्रवण’ हा मोक्षप्राप्तीचा एक सोपान चढू लागलो असेच वाटले.
‘लोकहितं मम करणीयम्’ हा आचार्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य बाई त्यांच्या व्याख्यानातून करतात. उपलब्ध वेळात शांकरमताचं आणि सोबत खंडण-मंडणपर शास्त्रार्थाने ज्याला खरी शोभा आली आहे अशा आपल्या समृद्ध परंपरेचं ‘दर्शन’ आज माहुलीकर मॅमच्या व्याख्यातून झालं! खऱ्या अर्थाने
की-नोट!
☺